हिंगोली : टोहा येथे पोलीस नाईक दिलीप बोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार | पुढारी

हिंगोली : टोहा येथे पोलीस नाईक दिलीप बोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील टोव्हा येथील पोलीस नायक दिलीप बोरकर कर्तव्यावर असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.९) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांदरी तालुक्यातील टोहा गावचे सुपुत्र असलेले दिलीप दत्तराव बोरकर पुणे येथे पोलीस दलात कार्यरत होते. ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी टोहा येथे शासकीय इतमामात अखेरची सलामी देऊन त्यांना निरोप देण्यात आला. हिंगोली पोलीस मुख्यालयातील जवानांनी बंदुकीतून हवेत फैरी झाडून त्यांना सलामी दिली. यावेळी पोलीस नाईक दिलीप बोरकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button