राज्य सहकारी बँकेस 602 कोटीचा निव्वळ नफा : अनास्कर | पुढारी

राज्य सहकारी बँकेस 602 कोटीचा निव्वळ नफा : अनास्कर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस 31 मार्च २०२२ अखेर आजवरची 111 वर्षातील उच्चांकी उलाढाल करीत सर्वच आघाड्यांवर यश मिळविले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये 3 हजार 426 कोटींची वाढ होऊन ते 47 हजार 28 कोटींपर्यंत पोहोचले आहेत. बँकेच्या निव्वळ नफ्यात 238 कोटींची वाढ होऊन तो 602 कोटींवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Russia Ukraine War Updates : युक्रेनवर हल्‍ला का केला? रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन यांनी सांगितले कारण

बँकेंच्या आकडेवारीमध्ये नक्त मुल्यांमध्ये गतवर्षापेक्षा पाचशे कोटींनी वाढ होऊन तो 3 हजार 203 कोटींपर्यंत, तर बँकेचा स्वनिधी 6009 कोटींपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये 626 कोटींची भरीव वाढ होऊन तो 1 हजार 402 कोटींवर पोहोचला आहे. सर्व तरतुदी करुन बँकेचा निव्वळ नफा 302 कोटींवर पोहोचल्याचे नमूद करुन ते म्हणाले, बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने सन 2018 मध्ये असलेला प्रति सेवक व्यवसाय 26 कोटींवरुन आज 65 कोटींपर्यंत पोहोचला आहे. सर्वच आघाड्यांवर बँकेने प्रगती केलेली आहे. गेली 9 वर्षे लेखापरिक्षणामध्ये बँकेस सतत ऑडिट वर्ग अ प्राप्त होत आहे. मागील आठ वर्षे बँक सभासदांना 10 टक्क्यांइतका लाभांश देत असून, दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटीइतकी रक्कम देत आहे.

Sri Lanka crisis : श्रीलंकेत अराजकता! संपूर्ण देशात कर्फ्यू लागू, सरकार समर्थक-आंदोलकांत जोरदार धुमश्चक्री

शासनाने दिलेले भागभांडवल परत

2011 मध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य बँकेस शासनाकडून मिळालेले शंभर कोटी रुपयांचे भागभांडवल परत दिलेले आहे. अशा प्रकारे रक्कम परत करणारी सहकार क्षेत्रातील ही एकमेव बँक ठरलेली आहे. बँकेत स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केल्याने सेवकांची संख्या 1800 वरुन आता 750 झाली आहे. त्यामुळे वार्षिक 192 कोटींनी पगार खर्च कमी झालेला असून, व्यवसायात दुप्पट वाढ झाली आहे. बँकेने आपले व्यवहार जिल्हा बँका, साखर कारखान्यांपुरते मर्यादित न ठेवता नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र, राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकर्‍यांना शेतमाल तारणावर थेट कर्जपुरवठा आदींमुळे बँकेच्या व्यवसायात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

priyanka chopra : प्रियांकाच्या लेकीचा पहिला फोटो आला समोर

राज्य बँक : 31 मार्च 2022 अखेरची स्थिती

  • 111 वर्षातील उच्चांकी उलाढाल
  • 47 हजार 28 कोटींचा व्यवहार
  • 25 हजार 962 कोटींची कर्जे
  • 1 हजार 402 कोटींचा ढोबळ नफा
  • 602 कोटींचा निव्वळ नफा
  • 6 हजार 9 कोटींचे स्वनिधी
  • नेट एनपीए शून्य टक्के

Back to top button