Gang Rape Case : सामुहिक बलात्कार प्रकरणी आंध्रच्या महिला गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gang Rape Case : सामुहिक बलात्कार प्रकरणी आंध्रच्या महिला गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
Published on
Updated on

अमरावती; पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) नुकतेच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या (Gang Rape Case) घटनेवर आंध्र प्रदेशच्या नव्या गृहमंत्री तनेती वनिता (Taneti Vanitha) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. रेपल्ले रेल्वे स्थानकावर १ मे रोजी २५ वर्षीय गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी त्या म्हणाल्या, आरोपींचा असा हेतू नव्हता, मात्र हा प्रकार अनपेक्षित परिस्थितीत घडला आहे. यापूर्वी विझाग येथे एका अल्पवयीन मुलावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी मुलाच्या सुरक्षेची जबाबदारी आईवर असल्याचे म्हटले होते.

गृहमंत्री तनेती वनिता यांनी बलात्काराच्या (Gang Rape Case) घटनांसाठी "मानसिक स्थिती" आणि गरिबीला जबाबदार धरले आहे. त्याचवेळी रेपल्ले रेल्वे स्थानकाच्या घटनेवर त्यांनी सांगितले की, आरोपीचा बलात्काराचा हेतू नव्हता. हे "अनपेक्षित पद्धतीने" घडले. कारण पुरुष दारूच्या नशेत होते आणि पीडितेच्या पतीला लुटण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला होता. पण त्या महिलेने हस्तक्षेप केला आणि मग बलात्कार 'अनपेक्षितपणे घडला'.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री तनेती वनिता म्हणाल्या, "महिलेने पतीवर हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या," पुरेसे रेल्वे पोलिस उपलब्ध नसल्याबद्दल दोष देता येणार नाही. रेल्वे स्थानकांवर आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दरम्यान, विरोधी तेलुगु देसम पक्षाने आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांच्या या विधानावर आक्षेप घेत हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.

१ मे रोजी रेल्वे स्थानकावर एका महिलेवर तीन आरोपींनी बलात्कार केला होता. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने पीडित महिलेच्या पतीलाही मारहाण करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news