

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा :
धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवार (दि.३०) सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी एकास ताब्यात घेतलं आहे.
शनिवारी सायंकाळी हनुमाननगर भागात शैलेश राजनाळे (वय 23, रा.नांदूरवेस ) हा घरातून बाहेर जाताना एकाने त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ताे गंभीर जखमी झाला. परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शैलेश याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतलं आहे.
हा खून पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे करीत आहेत.