हिंगोली : वादग्रस्त ठाणेदार बदलले | पुढारी

हिंगोली : वादग्रस्त ठाणेदार बदलले

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसार प्रशासकीय निकडीनुसार तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न अबाधित राखण्यासाठी प्रशासकीय कारणावरून जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी एकूण तेरा पैकी सात ठाणेदारांच्या बदल्या तडकाफडकी केल्या आहेत.

बदल्या झालेल्या ठाणेदारांत वादग्रस्त ठाणेदार पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांची औंढा नागनाथ येथून पोलिस नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. विद्यासागर सिरमनवार पोलिस कल्याण हिंगोली यांची बासंबा येथे बदली करण्यात आली आहे. विश्वनाथ किसनराव झुंजारे हिंगोली नियंत्रण कक्षातून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बासंबा ठाण्याचे ठाणेदार राजेश मल्लपिलू यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. कुंरूदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल गोपनिवार यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गजानन मोरे यांची पोलिस स्टेशन कुंरूदा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर जयेंद्र सरोदे यांची दहशतवादी विरोधी सेल यांची नियुक्ती हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी अधिकाराचा वापर करून प्रशासकीय बदल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणेदार यांच्या बदल्या तात्पुरती स्वरूपात केल्या आहेत. यामध्ये काही पोलिस अधिकारी वादग्रस्त ठरले आहेत. बदल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम आहे.

Back to top button