बीड : दोघांच्या झालेल्‍या वादात एकाने पोटात भोकसला चाकू

बीड : दोघांच्या झालेल्‍या वादात एकाने पोटात भोकसला चाकू

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे दोन व्यक्तींमध्ये झालेल्या वादात एका 35 वर्षीय व्यक्तीस चाकुने पोटात भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.20) दुपारी चारच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, राजपिंप्री येथील साईनाथ शिवाजी मिठे (वय ३५) हे दुपारी चारच्या सुमारास शहराजवळ असलेल्या पाढंरवाडी फाट्यावरील सार्थक हॉटेल जवळ गेले होते. आणि त्यांचा सोबत अन्य एकजण होता. अचानक या दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे हाणामारीमध्ये रूपांतर होऊन साईनाथ मिठे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने चाकू भोसकला. यामध्ये मिठे गंभीर जखमी झाले आहेत. तत्‍काळ त्यांना उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे कारण स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news