भंडारा : अत्याचाराच्या दोन गुन्ह्यात आरोपीला कारावास | पुढारी

भंडारा : अत्याचाराच्या दोन गुन्ह्यात आरोपीला कारावास

भंडारा,पुढारी वृत्‍तसेवा : दोन अल्पवयीन मुलींना गावाबाहेर पळवून नेऊन एकाने अश्लील कृत्य केले. या आरोपीला अत्याचाराच्या दोन गुन्ह्यामध्ये १२ आणि १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाकडून सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. गुरुदेव तुलाराम खोब्रागडे (वय २१) रा. रुयाळ असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, १९ ऑक्‍टोबर २०२१ रोजी एका ६ वर्षीय मुलीला गावाबाहेर पळवून नेऊन अश्लील कृत्य केले हाते. या आरोपी गुरुदेवविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या घटनेपूर्वी ४ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपीने ३ वर्षाच्या बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याने त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासानंतर पोलिसांनी त्‍याला न्यायालयात हजर केले. साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी गुरुदेव खोब्रागडे याला १० वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दुस-या गुन्ह्यात ५ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ७ वर्षांची शिक्षा सुनावली. या दोन गुन्ह्यांमध्ये आरोपीला १२ आणि १० वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button