बीड : संत सुदामदेव महाराज पुण्यतिथी, रामजन्मोत्सव उत्साहात | पुढारी

बीड : संत सुदामदेव महाराज पुण्यतिथी, रामजन्मोत्सव उत्साहात

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनुर येथे प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा व संत सुदामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव थाटात पार पडला. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आज (रविवार) उत्सवाची सांगता झाली. तसेच श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने भजन कीर्तनाच्या जयघोषात साजरा करण्यात आला. या वेळी प्रभू रामचंद्राच्या जय घोषणेने परिसर दुमदुमून गेला.

आमदार विनायक मेटे, अक्षय मुंदडा, श्री ह भ.प हरिहर भारती, महाराज श्री. हभप नवनाथ महाराज , श्री हभप प्रा. नाना महाराज कदम, श्री हभप सुधाकर महाराज शिंदे, संतोशानंद शास्त्री महाराज, सत्यवान महाराज लाटे, मारुती महाराज चोरमले, तुकाराम महाराज शास्त्री बेलेश्वर, विक्रम महाराज सारूक, विष्णुपंत लोंढे गुरुजी, विश्वनाथ अप्पा कपिलधार सुरेश महाराज जाधव, भारत काळे, अनिल जाधव,नारायण शिंदे यांच्या सह बंकटस्वामी संस्थान चे सर्व विश्वस्त व हजारों भविक भक्ताची उपस्थिती होती.

गायनाचार्य अभिमान महराज ढाकणे, तुकाराम महाराज करडकर, अचूत महाराज घोड्के, दिनेश महराज काळे, रणजीत महाराज शिंदे आदींची उपस्थिती होती. तसेच बंकट स्वामी महाराज फडावरील सर्व टाळकरी, भाविक उपस्थित होते.  पुढील वर्षी इथे भव्य कीर्तन मंडप उभा राहील, त्या मंडपात कीर्तन होईल, असे आश्वासन आमदार विनायक मेटे यांनी या वेळी दिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button