बीड : किल्ल्याजवळील दरीत सापडला मुकादमाचा मृतदेह | पुढारी

बीड : किल्ल्याजवळील दरीत सापडला मुकादमाचा मृतदेह

धरूर,(बीड) : पुढारी वृत्तसेवा

धारूर येथील किल्ल्याच्या बाजूच्याच दरीत लालाखडक येथे मुकदम नवनाथ धपाटे (६० वर्ष) यांचा मृतदेह सोमवारी (दि.२८) सकाळी आढळून आला. ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून, पुढील तपास करत आहेत.

सदर मृत व्यक्ती शुक्रवारी (दि.२५) संध्याकाळपासून बेपत्ता होती. त्यानेतर धारूर येथील एका किल्ल्याजवळील लाला खडक भागातील बाजूच्याच दरीत २८ मार्चच्या सकाळी एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना समजताच धारूर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर या मृतदेहाची पहाणी केली असता, मृताच्या खिशात अधार कार्ड सापडले आहे. यावरून पोलीसांनी इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेतला.

संबंधित मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलवले असता, या ची ओळख पटली. नवनाथ धपाटे (६० वर्ष) हे मुकदम धारूर येथील पाटील गल्लीतील रहिवासी असल्याचे समजते, पण मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,असे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button