पैठण-पाचोड रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार | पुढारी

पैठण-पाचोड रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पाचोड रस्त्यावर कॅनॉलजवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात (accident) दोन जण जागीच ठार झाले. नितीन कडुबा साबळे (रा. जोगेश्वरी वाळुज, औरंगाबाद) आणि गणेश एकनाथ शेळके (रा. खुंठेफळ, ता. शेवगाव जि. अहमदनगर) असे मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हा अपघात (accident) एवढा भीषण होता की अपघातातील बॉक्सर दुचाकी रस्त्यापासून दोनशे मीटर अंतरावर फेकली गेली. तर बुलेटचे मोठे नुकसान झाले. गणेश शेळके हा कुतुबखेडा (ता. पैठण) येथे कार्यक्रम करुन नातेवाईकांसोबत बुलेटवरुन खुंठेफळ गावाकडे जात होता. तर नितीन कडुबा साबळे हा आपल्या पत्नीला १२ वी परीक्षेसाठी पैठण येथील परीक्षा केंद्रावर सोडून पैठणहून पाचोडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

या अपघातात बुलेटवर पाठीमागे बसलेला युवक रस्त्यापासून दूर फेकला गेला. तर गणेश एकनाथ शेळके व नितीन साबळे हे दोघे तरुण जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तत्काळ अपघात स्थळी भेट दिली. दोन्ही तरुणांचे मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले करीत आहेत.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ 

उधवस्त झालेलं तळीये गाव आता कुठल्या अवस्थेत आहे?

Back to top button