बीड : गॅस कटरने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न | पुढारी

बीड : गॅस कटरने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

केज (जि.बीड) : केज येथील कानडी रोड वरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम फोडयाचा प्रयत्‍न केला. दोन अज्ञात चोरट्यांनी शटर गॅस कटरने उचकटून एटीएम मशिनचा दरवाजा फोडला. मात्र एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आज (दि २२) पहाटे ३:५१ वा. च्या सुमारास केज जि. बीड येथील कानडी रोड नजिक असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएमचे शटर कापून प्रवेश केला. आत गेलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्‍यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. येथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ते दोघेही कैद झाले आहेत.

यामध्ये एकाने हिरव्या रंगाचे कानटोपी, निळ्या रंगाचे उबदार स्वेटर आणि बदामी रंगाची पॅन्ट घातले आहे तर, एका हातात टॉर्च आहे. तर दुसऱ्याने भगवी रंगाची कान टोपी, काळे जाकीट आणि हिरवट काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केले आहे. या चोरीच्या प्रयत्नांची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी चोरट्या विरुद्ध भा.दं.वि. ५३/२०२२ गु.र.नं. ३८०, ४५२ व ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच केज शहर आणि परिसरातील बँकेचे ज्या ठिकाणी एटीएम आहेत, त्‍या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक ठेवणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही आणि अलार्म बसविणेबाबत गेल्‍या आठवड्यात केज शहरातील सर्व बँकेच्या व्यवस्थापकांनी बैठक घेवून त्‍यांना सूचनाही दिलेल्या आहेत. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

हे ही वाचलं का  

Back to top button