पुणे : फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणात उमेदवारीसाठीच संघर्ष!

पुणे : फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणात उमेदवारीसाठीच संघर्ष!
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर/ सागर जगताप

पुणे : शहरात सत्ताधारी भाजपसाठी जे काही प्रभाग 'ए प्लस' म्हणून गणले जातात, त्यात फर्ग्युसन कॉलेज- एरंडवणे या प्रभाग क्र. 16 चा समावेश होऊ शकतो. मात्र, या प्रभागात भाजपचे सात विद्यमान नगरसेवक एकत्र आले असून, आता इच्छुकांना निवडून येण्यासाठी नाही, तर उमेदवारी मिळविण्यासाठी आणि विरोधी पक्षांना तुल्यबळ उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

Ward 16
Ward 16

भाजपातील दिग्गजांचा प्रभाव

महापालिकेचा सध्याचा प्रभाग क्र. 13 एरंडवणा-हॅपी कॉलनीचा जवळपास 60 टक्के आणि आणि प्रभाग क्र 14 डेक्कन जिमखाना -मॉडेल कॉलनी 40 टक्के अशा या दोन प्रभागांचा परिसर एकत्र येऊन प्रभाग क्र 16 फर्ग्युसन कॉलेज -एरंडवणे हा नवीन प्रभाग तयार झाला आहे. सध्याच्या या दोन्ही प्रभागांमध्ये भाजपचे प्रत्येकी चार नगरसेवक आहेत. आता नव्याने रचनेत या प्रभागात नगरसेवक दीपक पोटे, मंजूश्री खर्डेकर, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे, नीलिमा खाडे, जोत्स्ना एकबोटे आणि आमदार व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे एकत्र आले आहेत. त्यात आता शिरोळे हे आमदार झाल्याने ते आता स्पर्धेत नाहीत. तर एकबोटे यांचे घर मात्र प्रभाग क्र. 10 मध्ये गेले असल्याने त्यांचे कार्यक्षेत्र मात्र प्रभाग क्र. 16 मध्ये आल्याने त्यांनी उमेदवारीसाठी याच प्रभागात दावा केला आहे. याशिवाय अन्य इच्छुकांमध्ये सुनील पांडे, अजय दुधाने, प्रफ्फुल झागडे, रमा डांगी तसेच नगरसेविका खाडे यांचे चिरंजीव अपूर्व खाडे अशी इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपसाठी हा सर्वांत सुरक्षित प्रभाग मानला जात आहे.

भाजपाकडून पुनीत जोशी, गायत्री लांडे, कुणाल तोंडे, मिताली सावळेकर, गिरीश खत्री, अमोल डांगे, हर्षदा फरांदे हेही इच्छूक आहेत.आयत्यावेळी अनेक इच्छुक उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सात विद्यमान आणि अन्य पाच- सहा इच्छुक यामुळे उमेदवारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोण उमेदवारी खेचून आणणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत

एकीकडे भाजपकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच असली तरी विरोधी पक्षाकडे मात्र तुल्यबळ असले उमेदवार नाहीत. 2012 मनसेचे अनिल राणे या भागातून निवडून आले होते. आता ते पुन्हा मनसेकडून रिंगणात असतील. मनसेकडून राम बोरकर, मंदार बलकवडे, अंजनेय साठे, दत्तात्रय पायगुडे, नितीन दळवी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून युवा चेहरा म्हणून सुकेश पासलकर, अर्चना चंदनशिवे, सारिका कराळे, वेणू शिंदे , प्रा. मुक्ता गोविंद थरकुडे, सचिन कराळे यांनी कामाला सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून अभिषेक पळसकर, शिरीश आपटे, राजेश पळसकर, अनिल माझिरे, अतुल दिघे, गजानन थरकुडे, राम बाटुंगे, छाया भोसले, काँग्रेसकडून राजाभाऊ साठे, संदीप मोकाटे, सोनाली अजित जाधव, अजित ढोकळे, राजाभाऊ साठे अशी इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. एकंदरीतच या महाविकास आघाडीकडे उमेदवारांची कमतरता असल्याने भाजपमधील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न अखेरच्या क्षणी होण्याची शक्यता आहे.

उच्चभ्रू सोसायटी अन् झोपडपट्ट्याही

मगरपट्टा-साधना सोसायटीचा बनलेला प्रभाग क्र. 16 चे वैशिष्ट्य म्हणजे या प्रभागात संपूर्ण एरंडवणा परिसर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, बीएमसीसी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता परिसर, जंगली महाराज रोड, डेक्कन परिसर असा उच्चभ्रू सोसायटी असलेला परिसर आहे. याशिवाय खिलारेवाडी, ढेरेवस्ती, भालेकर वस्ती, रजपूत वीरभवन, एरंडवणा चावडी, भीमा ज्योती, पूरग्रस्त वसाहत 3, 7 आणि 10 गणेशनगर, संजय गांधी, शाहू वसाहत हा बहुतांश झोपडपट्टी आणि वस्ती भाग असलेला भाग या प्रभागात आला आहे.

  • एकूण लोकसंख्या : 67,103
  • अनुसूचित जाती : 2 हजार 243

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news