पाथर्डी : तनपुरवाडी शिवारातील २५ ते ३० एकरातील ऊस जळाला

पाथर्डी : तनपुरवाडी शिवारातील २५ ते ३० एकरातील ऊस जळाला

पाथर्डी; पुढारी वृत्तसेवा : शहरालगत असलेल्या तनपूरवाडी शिवारातील सुमारे 25 ते 30 एकरामध्ये असलेला ऊसाला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या शेतातील एका वीज रोहित्राचा मोठा आवाज झाला त्यानंतर ऊसाला आगली.

केदारेश्वर आणि तनपुरे साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगाराची ऊसाची तोड चालू असताना आगीने मोठ्या स्वरुपात रौद्ररुप धारण केले. प्रसंगावधान साधत ट्रॅक्टर ट्रॉलीचे परिसरातील नागरिकांनी नुकसान होऊ दिले नाही. मात्र ऊस तोडणी करणाऱ्या काही कामगारांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या.

उद्धव भाबड, विठ्ठलभाबड, नारायणपालवे, तुकारा दहिफळे, नामदे बडे, म्हातारदेव पालवे, महादेव पालवे, ज्ञानेश्वर पालवे, बाप्पू दहिफळे, रामनाथ दहिफळे या शेतकऱ्यांचा ऊसाला आग लागून ऊस जळाला. सुमारे तीस फुटापर्यंत आगीचे लोळ हवेत उंच गेले होते. तर तीन ते चार किलोमीटर लांबीपासून आगीचा धुर आकाशात पसरलेला होता.

मोहटादेवी रोडवरील मूकबधिर निवासी विद्यालय असून तिन्ही बाजूने ऊस शेती आहे. मागील बाजूने ऊस पेट घेत विद्यालयाजवळ येण्याच्यापूर्वीच येथील सर्व शिक्षक स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

याघटनेची माहिती मिळताच विद्यालयाचे विश्वस्त नंदकुमार डाळींबकर, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, राजेंद्र जोशी, सोनू डाळींबकर, गोरक्ष ढाकणे, मोहटा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व त्यांचे कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विद्यालयाला व शेतकऱ्यांना मदत केली.

पाथर्डी नगर परिषद व वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन अग्निशामक गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे शिवा पवार, अशोक बडे, काळू पवार, दिलावर शेख हे कर्मचारी तर पोलीस दल आणि वीज वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली.

ऊसाची लागवड करून अनेक महिन्यापासून ऊस सांभाळला आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर ऊस जळाला आहे. शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी आणि उर्वरित असलेला ऊस कारखान्याने त्वरित घेऊन जाण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाकडून कामगार तलाठी हरिभाऊ सानप यांनी तत्काळ जळीत उसाचे पंचनामे सुरु केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news