Hingoli Rape Case : बायकोवर बलात्कार करण्यासाठी पतीने केली मित्राला मदत - पुढारी

Hingoli Rape Case : बायकोवर बलात्कार करण्यासाठी पतीने केली मित्राला मदत

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली तालुक्यातील सवड येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बायको घरात एकटी असताना खुद्द पतीनेच मित्राला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार घडवून आणण्यास मदत केली आहे. हिंगोली तालुक्यातील सवड येथील घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतीसह अन्य एकाविरूद्ध पिडीत महिलेच्या तक्रारीवरून २० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hingoli Rape Case)

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सवड येथील राहत्या घरी पिडीत महिला एकटी होती. संबंधित महिलेचा पती संजय भानुदास थोरात याने त्याचा मित्र माधव जोगदंड (रा. सवड) यास घरात पाठविले.

पिडीतीने माधव जोगदंड यास प्रतिकार केला. जोगदंड याने पिडीत महिलेस व तिच्या मुलीस चाकुचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेच्या इच्छेविरूद्ध बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Hingoli Rape Case : पती घराबाहेर असताना कृत्य

विशेष म्हणजे पिडीत महिलेचा पती घराबाहेर असताना घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाभरात संताप व्यक्‍त होत आहे. पिडीतेचा पती वेळोवेळी पिडीत महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पिडीत महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी माधव जोगदंड व पिडीत महिलेचा पती संजय भानुदास थोरात यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम.मुपडे हे करीत आहेत.

Back to top button