unmukt chand : उन्मुक्तची ‘मेलबर्न रेनेगेड्स’मध्‍ये पदार्पणातच धमाकेदार कामगिरी | पुढारी

unmukt chand : उन्मुक्तची 'मेलबर्न रेनेगेड्स'मध्‍ये पदार्पणातच धमाकेदार कामगिरी

१९ वर्षांखालील (  U19 ) विश्वचषक विजेता संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद ( unmukt chand ) याने ऑस्‍ट्रेलियातील मेलबर्न रेनेगेड्स लीगमधील पदार्पणाच्‍या सामन्‍यातच धमाकेदार कामगिरी केली. ‘बीबीएल’ लीगमध्‍ये खेळताना त्‍याने ३८ चेंडूत ५१ धावा फटकावल्‍या.

शॉन मार्श ३८ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. यावेळी  १८३ धावांचा पाठलाग करणाऱ्या रेनेगेड्सला ५.१ षटकांमध्‍ये ४५ धावांची गरज होती. उन्मुक्त चंद याने ३८ चेंडूत ५१ धावा फटकावल्‍या. “नवीन रंग तुमच्यासाठी अनुकूल आहेत, असे ट्विट करत यापुढेही या लीगमध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगिरीसाठी सज्‍ज असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

उन्मुक्त चंदला २०१९  मधील बिग बॅश (BBL) लीगमध्‍ये सहभागी झाला हाेता. अशी कामगिरी करणारा ताे पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला हाेता. मात्र त्‍याला या स्‍पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आली नव्‍हती. उन्मुक्त चंद याच्‍या नेतृत्वाखाली भारताने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. विश्वचषकातील यशानंतर, चंदने आयपीएलमध्ये खेळला आणि भारत अ संघाचे नेतृत्वही केले; परंतु टीम इंडियासाठी ताे पात्र ठरला नाही. त्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली हाेती.

हेही वाचलं का? 

 

Back to top button