कोल्हापूर : शेंडा पार्कात 1100 बेडचे रुग्णालय

कोल्हापूर : शेंडा पार्कात 1100 बेडचे रुग्णालय
Published on
Updated on

कोल्हापूर : एकनाथ नाईक

शेंडा पार्कात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक हजार 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सीपीआर हॉस्पिटलवरील ताण कमी होणार आहे. नवे रुग्णालय उपनगराबरोबरच ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार असून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे.

सीपीआरमध्ये रुग्णांचा ओघ वाढला आहे. कोरोना काळात सुमारे 18 हजारहून अधिक जणांवर उपचार करण्यात आले. येथे दररोज एक हजार ते 1 हजार 300 बाह्य रुग्ण येतात. त्यापैकी 200 ते 300 रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. सीपीआरची क्षमता सहाशे बेडची आहे. रुग्णांची संख्या विचारात घेऊन 1 हजार 100 बेडचा हा प्रस्ताव तयार करण्यात आला. पूर्वी तो 700 बेडचा होता. त्यास शासनाने सहमती देत शेंडा पार्क वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत हे रुग्णालय उभारण्याचे ठरविले आहे.

शहरासह उपनगरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना ते सोयीचे होणार आहे. येथे स्वतंत्र 21 विभाग होणार आहेत. ऑपरेशन थिएटर, डायलिसिस, हृदयरोग, दंत, मनोविकार, स्त्रीरोग, कान-नाक-घसा असे विभाग अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. रुग्णसेवेसाठी सुमारे 40 एम.एस आणि एम.डी कनिष्ठ निवासी डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याला नॅशनल मेडिकल कौन्सिलकडून मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाचा आराखडा तयार केला आहे. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर रुग्णालयाची उभारणी सुरू होईल.

सीपीआर होणार 'मल्टिस्पेशालिटी'

सीपीआरमध्ये उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणे सध्या आहेत. यामध्ये भविष्यात वाढ करून गरजेप्रमाणे यंत्रणा उपलब्ध करून देऊन सीपीआर मल्टिस्पेशालिटी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्याद़ृष्टीने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. शेंडा पार्क येथे रुग्णालय झाल्यानंतर तेथे सर्वसाधारण आरोग्यसुविधा मिळतील तर सीपीआरच्या मल्टिस्पेशालिटी सुविधांमुळे सर्वसामान्य रुग्णांना फायदा मिळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news