कोल्हापूर : विधवा प्रथा बंदचा निर्णय क्रांतिकारी ; खा. शरद पवार

file photo
file photo

कुरुंदवाड ( कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा
हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. अशा निर्णयाच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील व हा कायदा अंमलात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने गावसभेत विधवा प्रथेवर बंदी आणून राज्यात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेऊन सरपंच सुरगोंडा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, समाजामध्ये परंपरागत विधवा महिलांसाठी असलेली प्रथा हेरवाडकरांनी मोडीत काढून राज्यातच नव्हे तर देशात आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव करून आपल्या गावांमध्ये विधवा महिलांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडावी.

मंत्री हसन मुश्रीफ व मंत्रिमंडळातील अन्य मंत्रिमहोदयांना सोबत घेऊन हा कायदा अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, हेरवाड ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील, अमोल कांबळे, मुक्‍ताबाई पुजारी, पोलिस पाटील रेखा जाधव, तंटामुक्‍त अध्यक्ष बाबुराव माळी, शांताबाई तेरवाडे, मंगल देबाजे, ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर, संभाजी मस्के, अनिता कांबळे, संजय पुजारी, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news