कोल्हापूर : ‘वडाप ‘ जीपचा अपघात, दुर्गमानवाडचे तेरा प्रवाशी जखमी

कोल्हापूर : ‘वडाप ‘ जीपचा अपघात, दुर्गमानवाडचे तेरा प्रवाशी जखमी

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड – कसबा तारळे मार्गावरील उतारावर कसबा तारळे येथे वडाप जीपचा अपघात झाला. यामध्ये वाहनातील तेरा प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील जखमी चार प्रवाशांना राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे तर काही जखमींना कोल्हापुरातील सीपीआर तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गावचा आठवडा बाजार असल्याने दुर्गमानवाड येथील नागरिक जीप मधून बाजारासाठी येत होते. दुपारी कसबा तारळे नजीकच्या तीव्र उताराला चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. किरकोळ जखमी प्रवाशांना जवळ असलेल्या कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले.

इतर जखमींपैकी सुमन कांबळे, सुलाबाई कांबळे, वालुबाई कांबळे, ताराबाई कांबळे या चार महिलांना राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही जखमींना कोल्हापुरातील सीपीआर तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसबा तारळे येथे झाला असून या अपघाताची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news