राशिवडे; प्रवीण ढोणे : पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या राधानगरी अभयारण्य व धरणक्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरु आहे. तालुक्यामध्ये सुरु असणाऱ्या "पाऊसमारा" मुळे विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल होत आहेत. तुळशी धरणक्षेत्रामध्ये आज सर्वाधिक १५० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ राधानगरी धरणक्षेत्रामध्ये ३९ मि.मी. तर काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये ५६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी, काळम्मावाडी आणी तुळशी धरणक्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये दिवसभरात (सकाळी ८ ते दु.४.३० पर्यत) ५६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेर १०९५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणामध्ये दिवसभरात ३९ मि.मी.पावसाची नोंद झाली असून, आज अखेर १५५२ मि.मी.पावसाची नोंद आहे. तर तुळशी धरणक्षेत्रामध्ये दिवसभरात सर्वाधिक म्हणजे १५० मि.मी.पावसाची नोंद झाली. आज अखेर १५७५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. नोकरदार आणि विद्यार्थी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच रस्त्यावरील पाण्याने भरलेले खड्डे चुकवत त्यांना प्रवास करावा लागत आहे. वेळेत न धावणाऱ्या बसेस आणि झाडे रस्त्यावर पडण्याच्या घटनांमुळे त्यांचे हाल हाेत आहेत. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हेही वाचा :