चंदगड : सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्ररणी दोघांना अटक

चंदगड : सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्ररणी दोघांना अटक
Published on
Updated on

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : चंदगड येथील तमीम खाजा पिरजादे (वय २५) व आयान इब्राहिम मुल्ला (वय २०) या तरुणांनी इन्स्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी चंदगड पोलिसांत ओमकार रामचंद्र बांदेकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पिरजादे व मुल्ला याना अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ, स्टेटस व स्टोरीज ठेवून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने तमीम पिरजादे याने आक्षेपार्ह स्टेटस व व्हिडिओ ठेवला होता. तसेच आयान इब्राहिम मुल्ला याने सुद्धा आक्षेपार्ह फोटो स्टोरी ठेवून दोन समजात भावना दुखावल्याने व जातीय तेढ निर्माण होईल असे स्टेटस व व्हिडिओ ठेवल्याची फिर्याद बांदेकर यांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कसेकर व हनुमंत नाईक करीत आहेत.

भावना भडकावू नका; पोलिसांचे आवाहन

कोल्हापूर दंगलीचे लोण चंदगड शहरात पसरू नये, याची खबरदारी चंदगड पोलिसांनी घेतली आहे. आरोपींना अटक करण्यापूर्वी पो. नि. घोळवे यांनी मुस्लिम समाजाची बैठक घेतली. अटक झाल्यानंतर कुणीही याचा विपर्यास करून समाजाच्या भावना भडकावू नयेत. ज्याने गुन्हा केला आहे. तोच या घटनेचा जबाबदार आहे. त्यामुळे याचा परिणाम सुरळीत असलेल्या व्यवस्थेवर होऊ नये. असे आवाहन केले. यावेळी सर्वांनी या घटनेचा निषेध केला व आजअखेर जसे चंदगडने जातीयवादाला थारा दिला नाही, असाच यापुढेही राहील असे बैठकीत एकमुखी ठरले.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news