कुरुंदवाड : शिवसैनिकांनी उतरविला कन्नड वेदिकेचा झेंडा

कुरुंदवाड : शिवसैनिकांनी उतरविला कन्नड वेदिकेचा झेंडा
कुरुंदवाड : शिवसैनिकांनी उतरविला कन्नड वेदिकेचा झेंडा
Published on
Updated on

पाच मैल-बोरगाव येथील महाराष्ट्र हद्दीतील स्वागत कमानीवर कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त कन्नड वेदीकेचा झेंडा लावण्यात आला होता. ही घटना शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांना कळताच तातडीने त्या ठिकाणी जावून कन्नड वेदिकेचा झेंडा उतरवून महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवण्यात आला.

कर्नाटक राज्योत्सव दिनाचे औचित्य साधून काही कन्नडिगांनी महाराष्ट्र हद्दीत असलेल्या कमानीवर कन्नड वेदिकेचा झेंडा लावला होता. याची माहिती शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांना मिळताच शिवसैनिकांनी त्या ठिकाणी पोचून घोषणाबाजी करत कन्नड वेदिकेचा झेंडा उतरला व महाराष्ट्राचा भगवा ध्वज फडकवला. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक धनवडे, युवासेना उप तालुकाप्रमुख मंगेश पाटिल, शिवसेना उप तालुकाप्रमुख युवराज घोरपडे, ऋषभ चौगुले, जयसिंग वडर, श्रेणीक माने, अमिर तहसीलदार, पृथ्वीराज रजपूत, निग्गाप्पा कृट्टेकरी, कृष्णा कोळी ,भरत सलगरे , निशांत गोरे,अमित कदम, श्रेयश धुमाळे , महेश वडर, कपिल माळी,अक्षय पाटिल व शिवसैनिक उपस्थीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news