

satej patil veer banda patil treatment: शाहुवाडी तालुक्याच्या लाल मातीतला हिरा ऑलम्पिक पैलवान वीर बंडा पाटील रेठरेकर यांच्यावर उपचार करण्याची आमदार सतेज पाटील यांनी जबाबदारी घेतली, त्यांच्यावर डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले.
चार दिवसापूर्वी बंडा पाटील आजारी उतारवयात त्यांच्या औषध उपचाराची हेळसांड या बाबत दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन एक लाख रुपयाची तात्काळ मदत केली होती. पुढील जबाबदारी देखील स्वीकारली होती.
बंडा पाटील गेली काही दिवस ते प्रकृती अस्वाथ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. परंतू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती त्यांच्यावर दै. पुढारीने वृत्त प्रसिध्द केले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांना समजताच बंडा पाटील यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आपल्या माध्यमातून त्यांनी तात्काळ एक लाख रुपये ची मदत केलीच. शिवाय डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये पूर्ण उपचार मोफत करण्याची ग्वाही दिली.
बंडा पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आमदार सतेज पाटील यांनी सर्व यंत्रणा सक्रिय केलेली होती. दवाखान्यात अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून ठेवल्या होत्या. आपल्या घरातीलच सदस्य आजारी असल्याच्या भावनेतून आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते प्रवीण केसरकर व त्यांचे सहकारी दवाखान्यात थांबून होते.