Dhananjay mahadik Satej Patil Condolence: 'पराभव झाला म्हणून खचू नकोस', धनंजय महाडिकांनी दिला डीवाय पाटील यांच्या आठवणींना उजाळा

Dhananjay mahadik Satej Patil Condolence
Dhananjay mahadik Satej Patil Condolencepudhari
Published on
Updated on

Dhananjay mahadik Satej Patil Condolence: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी धनंजय महाडिक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अरूंधती महाडिक देखील होत्या.

Dhananjay mahadik Satej Patil Condolence
Padmashri Dr DY Patil | विंचूच्या नव्या प्रजातीला दिले होते डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव; सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टने वाहिली श्रद्धांजली

खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांची मैत्री एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत होती. मात्र, २०१२ नंतर दोघांमध्ये राजकीय वैर निर्माण झालं आणि त्यानंतर अनेकदा व्यासपीठावर आणि राजकारणात दोघांनीही एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेतली.

मात्र, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर हे राजकीय मतभेद बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिक यांनी पत्नी अरुंधती महाडिक यांच्यासह कसबा बावडा येथील आमदार सतेज पाटील आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

Dhananjay mahadik Satej Patil Condolence
Satej Patil : दादा गेले... अन्‌ माझा अ‌ाधारवड हरपला

यावेळी धनंजय महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्याला खचून न जाता पुढे यश मिळेल, असा सल्ला दिला होता, अशी आठवण महाडिक यांनी सांगितली.

‘लोकसभेत पराभव झाला म्हणून खचून जाऊ नकोस, पुढे यश नक्की मिळेल,’ असा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्यानंतर २०१४ मध्ये आपण खासदार झालो, असंही धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितलं. तसंच, डॉ. डी. वाय. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र आमदार सतेज पाटील आणि संजय पाटील हे कर्तृत्ववान असल्याचाही उल्लेख खासदार धनंजय महाडिक यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news