Satej Patil Gokul election: मुरगूडमध्ये सतेज पाटील, रणजीतसिंह पाटील आणि प्रवीणसिंह पाटील यांची बंद खोलीत चर्चा

गोकुळ दुध संघात महायुतीला टक्कर देण्यासाठी सक्षम आघाडी उभा करण्यासाठी सतेज पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी रविवारी कागल तालुक्याचा दौरा केला.
Satej Patil Gokul election
मुरगूड येथे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या मेळाव्यात सतेज पाटील यांचे स्वागत करताना दिग्विजय पाटील सोबत रणजितसिंह पाटील, विश्वजित पाटील सत्यजित पाटील आदी. Pudhari Photo
Published on
Updated on

Satej Patil Gokul election

मुदाळतिट्टा: गोकुळ दुध संघात महायुतीला टक्कर देण्यासाठी सक्षम आघाडी उभा करण्यासाठी सतेज पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी रविवारी कागल तालुक्याचा दौरा केला. चार ते पाच तास मुरगूडमध्ये थांबून त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. आठ वर्षांपासून राजकारणात एकमेकांपासून वेगळे झालेले रणजितसिंह पाटील आणि प्रविणसिंह पाटील या दोन भावांमध्ये मनोमिलन करण्यात त्यांना यश आले. यावेळी प्रवीणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी तिघांच्यामध्ये बंद खोलीत झालेल्या चर्चेने चर्चांना उधाण आले आहे.

रविवारी मुरगूडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांचा एकत्रित महिला मेळावा होता. त्यामुळे सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची भेट होईल, असे अनेकांनी अंदाज बांधले होते. पण भेट दोघांनीही टाळल्याचे दिसून आले. उलट मुश्रीफ गट सोडून बंटी पाटील यांनी सर्वच गटाच्या प्रमुखांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते.

Satej Patil Gokul election
Gokul Election | अखेर 'गोकुळ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी पदी मौसमी चौगुले यांची नियुक्ती

सतेज पाटील यांनी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर रणजितसिंह पाटील हे आठ वर्षानी त्यांच्या जुन्या निवासस्थानी गेले. यामुळे वातावरण धीरगंभीर बनले होते. यावेळी सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मुरगूडच्या पाटील घराण्याचे योगदान मोठे असल्याचे सांगून शेतकरी संघ, गोकुळ दूध संघ, बिद्री कारखाना आदी ठिकाणी विश्वनाथराव पाटील यांनी भरीव कार्य केले होते. आज माझ्यामुळे हे दोन बंधू एकत्र येत आहेत हे पाहून आंनद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर वीरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंडलिक गटाच्या ठराव धारकांच्या मेळाव्यात गोकुळ वाचवण्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक व आपण प्रामाणिक प्रयत्न केले. पॅनल तयार करण्यात मंडलिक यांचे मोठे योगदान होते. कागलमध्ये वर खाली होत. त्यामुळे मागील निवडणुकीत मंडलिक गटाला दूर राहवं लागलं. यावेळी पक्षीय अडचणी आल्या तरी उघड नाही करता आले तरीही आपण गोकुळला वाचवण्यासाठी आमच्या मागे रहा, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली.

माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या घरी गोकुळ ठराव धारकांचा मेळावा पार पडला. दिवसभर मुरगूड शहरात सर्वच ठिकाणी माजी संचालक राहुल देसाई, शशिकांत पाटील, अभिजित तायशेटे, विशाल पाटील, बयाजी शेळके, अंजनाताई रेडेकर, राजू लाटकर, बाबासाहेब चौगले, सदाशिव चरापले, विश्वजित पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, विश्वजित पाटील यांनी सतेज पाटील यांचे स्वागत केले.

संजय मंडलिक यांचा आदेश

सतेज पाटील कागलमधील ठराव धारकांना भेटण्यासाठी गावोगावी जाणार होते. रविवारी सकाळीच संजय मंडलिक यांची भेट घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरवात केली. यावेळी तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून मुरगूडमध्ये मंडलिक गटाचे ठराव धारक एकत्र येतील तेथेच आपण जाऊन भेटा, असे मंडलिक यांनी सतेज पाटील यांना सांगितले. त्यानुसार मुरगूडमध्ये मंडलिक गटाचा मेळावा पार पडला.

Satej Patil Gokul election
Gokul Election | आ. सतेज पाटील यांच्या कागलमधील भेटींनी तर्क-वितर्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news