कोल्हापूर : पेठवडगावात आढळले दुर्मिळ स्थलांतरीत पेंटेड लेडी फुलपाखरू

कोल्हापूर : पेठवडगावात आढळले दुर्मिळ स्थलांतरीत पेंटेड लेडी फुलपाखरू
Published on
Updated on

[author title="राजकुमार चौगुले" image="http://"][/author]

किणी; पुढारी वृत्तसेवा : आपण पक्षी स्थलांतर करतात हे पाहिले आहे, पण फुलपाखरे सुद्धा स्थलांतर करतात. पेठवडगाव येथील महालक्ष्मी देवराईमध्ये सोमवारी (दि.३) सकाळी निसर्गप्रेमी मित्र मंडळाचे डॉ. अमोल पाटील यांना पेंन्टेड लेडी हे फुलपाखरू आढळून आले.

पेंन्टेड लेडी हे निम्फॅलिडे कुलातील आकाराने दोन-तीन इंच असलेले सुंदर फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू सर्वाधिक लांबचा प्रवास करणारे म्हणजेच स्थलांतर करणारे आहे. आंतर खंडीय स्थलांतर करणारा हा जीव युरोप ते आफ्रीका व उलट असा प्रचंड प्रवास करते, काही तर आफ्रीका ते आशिया खंड असाही हजारों किलोमीटरचा प्रवास करतात. स्थलांतर करण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे ही फुलपाखरे जगभर सगळीकडेच पसरतात. फक्त आस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका  या खंडात आढळून येत नाहीत. उत्तर अमेरिका ते दक्षिण अमेरिका असा स्थलांतरीत प्रवास  करायला या फुलपाखरांच्या सहा पिढ्या लागतात, असा अभ्यास झाला आहे.

जगभर आढळून येत असल्यामुळे या फुलपाखरांचे खाद्य वनस्पती देखील भरपूर प्रजातींच्या आहेत. आजमितिस या फुलपाखराच्या जवळपास ३०० प्रजातींच्या खाद्य वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे. जरी जगभर हे फुलपाखरू पसरले असले तरी, भारतात यांची संख्या कमी आहे. याच स्थलांतरामुळे या फुलपाखरांच्या उप-जाती नाहीत. या फुलपाखरांच्या अळ्या विषारी चीक असलेल्या वनस्पतीवर उपजीविका करतात आणि ते द्रव्य आपल्या शरीरात साठवून ठेवतात. त्यामुळे परजीवी शत्रुंना या अळ्या आवडत नाहीत. ही फुलपाखरे भारतात हिवाळानंतर पावसाळ्यापर्यंत दिसतात. यापूर्वी हे फुलपाखरू कोयना येथील घाटमाथा परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सादळे येथील सिधोबा डोंगरात आढळून आले होते. फुलपाखरू अभ्यासक डॉ संतोष उमराणे, फारुक म्हेतर यांनी या फुलपाखरासंबंधी माहिती देताना आपल्याकडे विविध प्रजातींच्या फुलपाखरांचा अधिवास असल्याने अशा फुलपाखरांच्या नोंदी आणि अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news