Radhanagari Flood : महापुराच्या पाण्यात पोहत जाऊन केली वीज वाहिन्यांची जोडणी

वीज कर्मचाऱ्यांवर राधानगरी तालुक्यात कौतुकाचा वर्षाव
Radhanagari Flood
वीज कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात पोहत जाऊन वीज वाहिन्या जोडल्या Pudhari
Published on
Updated on

धामोड (राधानगरी) : गेला आठवडाभर संपूर्ण जिल्ह्याला महापुराचा वेढा पडला आहे. अनेक मार्ग बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपत्ती निवारण विभाग अहोरात्र कष्ट घेताना दिसत आहे. यामध्ये वीज वितरण विभागाचे योगदान मोठे आहे. वेळुचे बेट व पुरातून वाहून आलेले मोठा वृक्ष वीजवाहिन्यांमध्ये अडकल्यामुळे सुमारे ५० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. या महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून वीजवाहिन्यांची जोडणी करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Radhanagari Flood)

राधानगरी धरण भरल्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आला आहे. कोथळी येथून राधानगरी तालुक्यातील धामोड व आवळी उपकेंद्राना वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर  घोटवडे येथे भले मोठे वेळूचे बेट कोसळले. तर आवळी येथे नदीच्या मध्यभागी भला मोठा वृक्ष वीज वाहिन्यांमध्ये अडकला. राधानगरी तालुक्यातील ५० हून अधिक गावे अंधारात गेली.

Radhanagari Flood
Kolhapur Flood Update | निवारा केंद्रात १७२ विस्थापित कुटुंबे दाखल

वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लाईनमन युवराज चौगले, चंद्रकांत भोई, सागर पाटील, शिवाजी कांबळे, नेताजी कुंभार यांच्यासह पंधरा कर्मचारी चार फूट पाण्यातून सुमारे दिड किमी. पायी चालत जाऊन आणि अर्धा किमी. नदीपात्रात पोहत गेले. वृक्ष तोडून, तुटलेल्या वीजवाहिन्या जोडल्या. घोटवडे येथील वेळुचे बेट तोडून वीजपुरवठा सुरू केला.

Radhanagari Flood
Hatkanangle News : निलेवाडी पुराच्या विळख्यात, ९० टक्के नागरिकांचे जनावरांसह स्थलांतर

मुसळधार पाऊस आणि महापुरात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सकाळी सहा ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत, उपाशी पोटी राहुन कर्तव्य बजावलेल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

Radhanagari Flood
Kolhapur Weather Forecast | कोल्हापूरसाठी दोन दिवस महत्त्वाचे! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news