कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : बोचरी थंडी अन् धुके… सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत मोठ्या उत्साहात दै. 'पुढारी राईज अप' अॅथलेटिक्स स्पर्धेत महिला खेळाडू धावल्या. रखरखत्या उन्हात अंगामधून वाहणार्या घामाच्या धारांसह गोळाफेक, लांब उंडी, उंच उडी स्पर्धेत खेळाडूंनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दिवसभर विविध गटांतील स्पर्धा झाल्या. पाल्यांचा खेळ पाहण्यासाठी पालकांसह नातेवाईकांनी शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकांनी 'पुढारी राईज अप' स्पर्धा महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. Kolhapur News