‘पुढारी राईज अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व | पुढारी

‘पुढारी राईज अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘पुढारी राईज अप’ महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धेवर कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवशी 15 व 19 वयोगटातील मुलींच्या विविध स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या खेळाडूंनी बाजी मारत पहिल्या सहा क्रमांकांत स्थान मिळविले.

शुक्रवारी झालेल्या स्पर्धेतील प्रत्येक गटात पहिले सहा क्रमांक मिळविणारे अनुक्रमे खेळाडू असे : 

15 वर्षांखालील गट : 1000 मीटर धावणे : चैताली चव्हाण (मार्डी), ऋतुजा जाडे (परसराम विद्यालय दुंडगे), रेशमा चव्हाण (एस जीआयएस), संस्कृती वराड (केखले), आकांक्षा देवकर , वेदिका जाधव (प्रायव्हेट इंग्लिश स्कूल). 80 मीटर हर्डल्स : स्वराली कुडाळे (केशवराव पवार इंग्लिश स्कूल), जुबिया मुल्लानी (एसआरएमएच), अनुष्का निकम (सातारा), जानवी घोडके (कबनूर हायस्कूल), सई पाटील (इस्लामपूर), नेहा पाटील (आरएससी विद्यानिकेतन). गोळाफेक (शॉट पुट) : तनिष्का शेजवळे, (इस्लामपूर), वेदांती पाटील (इचलकरंजी), अनुष्का जगताप (कराड), शांभवी हिरेमठ (राजर्षी शाहू हायस्कूल), गौरी बागडे ( बालिंगा हायस्कूल), भक्ती जाधव (कन्या शाळा कुपवाड). उंच उडी : जानवी घोडके, संचिता बिराजदार (कबनूर हायस्कूल), जानवी पाटील, अन्नपूर्णा शिकलगार (न्यू इंग्लिश स्कूल पोहाळे), स्वरा जोशी (सांगली), समीक्षा पाटील. 600 मीटर धावणे : चैत्राली चव्हाण , ऋतुजा जाडे, सदिच्छा नगरपोले (कागल), आकांक्षा देवकर, संस्कृती वराड , सृष्टी मोरटी, (गडहिंग्लज). 80 मीटर धावणे : प्रतीक्षा मुगडे (वारणा विद्यालय), अक्षरा पोटे (न्यू होरायझन स्कूल), पूर्वा पाटील (इस्लामपूर हायस्कूल), दिव्या कुंभार (आरएससी विद्यानिकेतन), सिद्धी माळी (महाकाली हायस्कूल), सुमेधी चौगुले (सेंट झेवियर्स हायस्कूल). लांब उडी : स्वराली कुंडली (केशवराव पवार इंग्लिश स्कूल कराड), अनुष्का परीट (युवा क्लब), अनुष्का निकम (करंदी), अन्वेषा सोंदुर (संजय घोडावत), संचिता बिराजदार (कबनूर), अनघा डांगे (महाराष्ट्र स्कूल कोल्हापूर). 200 मीटर : प्रतीक्षा मुगडे (वारणानगर), सदिच्छा नागरपोळे (कागल), सिद्धी माळी (कवठेमहांकाळ), तेजस्विनी रत्नपारखी (जागृती विद्यामंदिर), अक्षरा पाटे (औरनाळ), वैष्णवी कुंभार (जागृती हायस्कूल गडहिंग्लज). 4 बाय 100 रिले : राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर, वारणा विद्यालय, इस्लामपूर हायस्कूल, विद्यानिकेतन स्कूल राजारामनगर, केर्ली कन्या विद्यामंदिर, उजळाईवाडी विद्यामंदिर.

19 वर्षांखालील गट : गोळाफेक (शॉट पुट) राजनंदिनी सोनवणे (कराड), अंकिता थोरात (कराड), योगिनी कोकरे (कराड), श्रावणी निकम (महात्मा गांधी विद्यालय बांबवडे), सलोनी सय्यद (गोविंदराव कॉलेज इचलकरंजी), सानिया पाटील (विवेकानंद कॉलेज कोल्हापूर). 800 मीटर धावणे : अदिती खोत (पी. बी. पाटील हायस्कूल), सुया जाधव (सांगली), स्नेहा पाटील (सांगली), आदिती डोकरे (कमला कॉलेज कोल्हापूर), तनुजा दिवसे (कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी). 100 मीटर ः प्रणिता बावडेकर (सांगली), मधुरा बिरजे (कॉमर्स कॉलेज कोल्हापूर), लीना कोहाले (न्यू कॉलेज कोल्हापूर), सानिया चिकोडे (घोडावत महाविद्यालय), ममता पाटील (जागृती कॉलेज गडहिंग्लज), अमृता यलापराटे (मिरज). 100 मीटर हर्डल्स : लीना कोहाळे (न्यू कॉलेज कोल्हापूर), पूर्वा केंजळे, अपूर्वा बोटे (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा), सृष्टी मोरे (दीदी पाटील ज्युनिअर कॉलेज), वैष्णवी निकम (पीव्हीपी कॉलेज). उंच उडी : प्रतीक्षा अडसुळे (डीकेसी कॉलेज इचलकरंजी). 3000 मीटर- गौरी वागरे (दूधसाखर महाविद्यालय बिदरी), सन्मयी शिंदे (कॉमर्स कॉलेज कोल्हापूर), कनम इंगळे (शांतिनिकेतन स्कूल), नंदिनी जयस्वाल (दत्ताजीराव कदम कॉलेज), गायत्री कवडे (भोगावती कॉलेज), मनीषा पाटील (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर). 400 मीटर धावणे : मधुरा बिरजे (कॉमर्स कॉलेज कोल्हापूर), ममता पाटील (जागृती कॉलेज गडहिंग्लज), सृष्टी मोरे (कॉलेज मुदायी), श्रीया जाधव (सांगली), अमृता यल्लापार्टे (मिरज), श्रीया पाटील (वारणा). लांब उडी : अपूर्वा बोटे (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा), प्रणिता बावडेकर (सांगली), सानिका मगदूम (बिद्री), सानिया चिकोडे (के. एम. कॉलेज जयसिंगपूर), पूर्वा केंजाळे (छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा), समृद्धी बाबर (के. एम. कॉलेज जयसिंगपूर). 1500 मीटर : वैष्णवी रावळ (संभाजीराव माने कॉलेज), गौरी वागरे (दूधसाखर महाविद्यालय बिद्री), सन्मई शिंदे (कॉमर्स कॉलेज कोल्हापूर), कनम जंगले (शांंतिनिकेतन कॉलेज), नेहा बाणदार (यशोदीप). 4 बाय 100 मीटर रिले : के. एम. घोडावत जयसिंगपूर, डी.आर.के. कॉमर्स कॉलेज कोल्हापूर.

राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

महिला खेळाडूंना प्रोत्साहन व पाठबळ देण्याच्या उद्देशाने आयोजित राईजअप स्पर्धेत नवोदित खेळाडूंसोबत राष्ट्रीय खेळाडूंनीही उत्सफूर्त सहभाग नोंदविला. यात मधुरा बिरजे, ममता पाटील, प्रणिता बावडेकर, लीना कोहाळे, स्वराली कुडाळे, प्रतीक्षा मुगडे आदींचा समावेश आहे.

बीब्स स्पर्धेच्या ठिकाणी मिळणार

स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना बीब्स (चेस्ट नंबर) स्पर्धेदिवशी- स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 7 ते 9 यावेळेत मिळतील. मैदानावर नवीन रजिस्ट्रेशन घेण्यात येणार नाही.

प्रशस्तिपत्र, पदकांसह रोख बक्षिसे

स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्य पदक, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम, चार ते सहा क्रमांकांना रोख पारितोषिके आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

केएमटी बस अन् अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था

स्पर्धेसाठी येणार्‍या महिला-मुलींसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्र्‍याने केएमटी बसची आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातर्फे दोन अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा कालावधीत सायंकाळी 5 व 6 वाजता शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक ते कोल्हापूर रेल्वे स्टेशन या मार्गावर दोन बसेसची व्यवस्था असणार आहे. याशिवाय दिवसभर कागल, कणेरीमठ या मार्गावरील बसेसही सिंथेटिक ट्रॅक मैदानाशेजारील स्टॉपला थांबणार आहेत. याशिवाय मैदानात तीन दिवसांच्या स्पर्धा कालावधीत दोन सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्ससह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) आरोग्य पथक सज्ज असणार आहे.

Back to top button