कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली | पुढारी

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी आता अमोल येडगे (amol yedge) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल रेखावार यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण मंडळाच्या संचालकपदावर घेण्यात आले आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांची कारकीर्द लक्षवेधी ठरली. कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना एक वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. अखेर रेखावर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमोल येडगे हे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) संचालकपदी कार्यरत असलेले अमोल येडगे यांनी यवतमाळच्या येथे जिल्हाधिकारीपदाचीही सांभाळली आहे. आता याच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर राहुल रेखावार यांची बदली झाली आहे.

Back to top button