पुढारी वृत्तसेवा : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमानसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचारमंथन मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'चे कोल्हापूर येथे आज ( दि.13 ऑक्टोबर) रोजी उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे, ‘पुढारी’ वृत्त समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. (Pudhari News Vikas SUMMIT 2024) तुळशीदास भोईटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. सावंत यांनी महाआरोग्य पर्व हे कॉफी टेबल बुक डॉ. योगेश जाधव यांना दिले.
महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून चर्चा होत आहे. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट सुरु असून, त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन सुरु आहे.
'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' च्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेत उद्योग, महिला कल्याण, आरोग्य आणि कृषी हे विषय केंद्रस्थानी आहेत. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासधोरणांचा राज्यातील मंत्री, समाजसेवक, धोरणकर्ते यांच्या चर्चेतून रोडमॅप आखला जाणार आहे.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, राज्य नियोजन मंडळाचे (मंत्रीपद दर्जा) कार्यकारी अध्यक्ष राजेश श्रीरसागर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (मंत्रीपद दर्जा) अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार विनय कोरे, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आयुष्यमान भारत मिशनचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे, एमसीसीआयएचे निवृत्त महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी आदी मान्यवर चर्चेत सहभागी झाले आहेत.'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' : मंत्री उदय सामंत मांडणार उद्योग विकासाचा रोडमॅप