'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' : रुपाली चाकणकर यांचा सहभाग

महिलांच्या प्रश्नी लढणाऱ्या नेत्या म्हणून ओळख
Pudhari News Vikas SUMMIT 2024, Rupali Chakankar
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर.(Image source- Rupali Chakankar X account)
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमाणसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. या चर्चेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (मंत्रीपद दर्जा) अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) सहभागी होत आहेत.

रुपाली चाकणकर : नगरसेविका ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

रुपाली चाकणकर ह्या मूळच्या दौंडमधील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून शिक्षण घेतले. त्यांना अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला होता. त्यांच्या लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे त्या राजकारणात आल्या. पुढे नगरसेविका ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असा त्यांचा प्रवास राहिला. महिलांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिलांच्या प्रश्नी त्या सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडतात. २००२ पासून त्यांनी पुढील काही वर्षे महिला बचतगटासाठी काम केले. पुढे त्यांना खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळाले. तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ झाला.

राज्य महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने त्यांनी बालविवाह, विधवा प्रथा, मानवी तस्करी, कौंटुबिंक हिंसाचार, महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करत प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणी, ई सायबर सुरक्षा मोहीम, टोल फ्री क्रमांकांच्या माध्यमातून तात्काळ दाखल घेत कारवाई, जनता दरबाराच्या माध्यमातून हजारो पीडितांना न्याय मिळवून दिला आहे.

Pudhari News Vikas SUMMIT 2024
13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.(Pudhari Photo)
Pudhari News Vikas SUMMIT 2024, Rupali Chakankar
स्वप्न नव्या महाराष्ट्राचे! पाहा पुढारी NEWS वर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news