'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' : डॉ. तानाजी सावंत मांडणार आरोग्य क्षेत्राचा लेखाजोखा

राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र बदल- तानाजी सावंत
Dr Tanaji Sawant, Pudhari News Vikas SUMMIT 2024
'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'मधील चर्चेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत सहभागी होणार आहेत. (File photo)
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमाणसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. या चर्चेत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत सहभागी होणार आहेत.

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' च्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेत उद्योग, महिला कल्याण, आरोग्य आणि कृषी हे विषय केंद्रस्थानी असतील. यावेळी महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासधोरणांचा राज्यातील मंत्री, समाजसेवक, धोरणकर्ते यांच्या चर्चेतून रोडमॅप आखला जाईल.

राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र बदल- तानाजी सावंत

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेत सध्या ९९७ रुग्णालयांचा समावेश होता. योजनेची व्याप्ती १९०० रुग्णालयापर्यंत करण्यात येणार आहे. दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, गरजू वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी, वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या वर्षी एकूण १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य सेवा - सुविधा देण्यात आल्या. शहरी भागातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवणे, सातत्यपूर्ण आरोग्य सेवा देणे, जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात ३४७ आपला दवाखाना कार्यरत आहेत. हृदयरोगींसाठी राज्यात १२ ठिकाणी कॅथलॅबची सुविधा देण्यात आली आहे, तर १७ ठिकाणी एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सध्या लाखांच्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. या अभियानातून तीन वर्षात २७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

राज्यात सुमारे ४ कोटी १८ लाख ९२ हजार ३०७ जनतेची आभा कार्डची निर्मिती करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमतेसाठी ८५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आता राज्य शासनाकडून १० हजार रुपये व केंद्र शासनाचे तीन हजार असे एकूण १३ हजार रुपये मानधन आशांना देण्यात येत आहे. राज्यात ३,६६४ गट प्रवर्तक कार्यरत असून शासनाकडून ६,२०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये १,००० रुपयांची वाढ केली आहे.

तानाजी सावंत यांचा राजकीय प्रवास

तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी पीएचडी पर्यंत शिक्षण घेतले आहे. उद्योग, शिक्षण आणि कारखानदारी क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. ते २०१६ मध्ये यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. २०१९ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. सध्या ते सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news