Kolhapur News : ‘शाहू’ कारखान्याची ३१०० रूपये एफआरपी जाहीर : अमरसिंह घोरपडे

Kolhapur News : ‘शाहू’ कारखान्याची ३१०० रूपये एफआरपी जाहीर : अमरसिंह घोरपडे
Published on
Updated on

कागल; पुढारी वृत्तसेवा :  येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एक रक्कमी एफआरपी ३ हजार १०० रूपये जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, ही एफआरपीची रक्कम विनाकपात एक रकमी देण्यात येणार आहे. हंगाम समाप्तीनंतर महसूल विभाग तपासणीनुसार (आर. एफ. एस) जो दर निघेल, तो दर देण्यास कारखाना कटिबद्ध आहे. यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपला पिकवलेला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम, सुनील मगदूम, राजू पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा :

.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news