Beed Maratha Andolan: मराठा आरक्षणावरून बीड पेटले; राष्ट्रवादी कार्यालयासह क्षीरसागर काका -पुतण्याचे घर पेटवले | पुढारी

Beed Maratha Andolan: मराठा आरक्षणावरून बीड पेटले; राष्ट्रवादी कार्यालयासह क्षीरसागर काका -पुतण्याचे घर पेटवले

बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्न सोमवारी (दी.30) सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांचे घर, नगरपरिषद कार्यालय याला आग लावली. दुपारनंतर बीड येथे मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर,  हॉटेल सनराईज, महावीर हॉस्पिटल व इतर काही इमारती पेटवून देण्यात आली आहे. इतरही ठिकाणी जाळपोळ केली आहे. दगडफेक तर संपूर्ण शहरात करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे तीव्र पडसाद बीडमध्ये उमटले आहेत. (Beed Maratha Andolan)

आतापर्यंत अतिशय शांततेत सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनाने सोमवारी उग्ररूप धारण केले. माजलगाव येथे प्रकाश सोळंके यांचे घर, नगरपरिषद, पंचायत कार्यालय येथे आग लावल्यानंतर दुपारी बीड येथे मराठा समाजाचे आंदोलन आक्रमक आंदोलन करत होते. सुरुवातीला पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून कुलूप ठोकण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद, नगरपरिषद येथे आंदोलन करण्यात आले. यानंतर बीड शहरातील प्रमुख रस्ता असलेला सुभाष रोड बॅरिकेट आडवे टाकून वाढवण्यात आला. सायंकाळच्या सुमारास मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी बीड येथील राष्ट्रवादी भवनाला आग लावली. यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ऑफिस आंदोलकांनी पेटवले. (Beed Maratha Andolan)

दरम्यान, समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या सनराइज हॉटेललाही आग लावली. दरम्यान, बीड येथील जालना रोडवरचे डॉ. बडजाते यांचे महावीर हॉस्पिटल आंदोलकांनी पेटवून दिले. बीड शहरातील सर्वच रस्त्यावरील दुकानावर देखील मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. बीड शहरात सोमवारी मराठा आंदोलकांच्या तीव्र भावनांचा संताप दिसून आला. कोट्वयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मराठा आंदोलन जाळपोळ आणि दगडफेक करताना पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले. बीड येथे मराठा आंदोलनाने उग्ररूप धारण केले असून त्याचे हिंसक पडसाद दिवसभर जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. मराठा आंदोलनाची ही धग लवकर शमली नाही तर त्याची मोठी किंमत शासन, प्रशासन आणि सामान्य जनतेला मोजावी लागणार आहे.

Beed Maratha Andolan आकाशवाणी केंद्रालाही लावली आग

मराठा आंदोलकांनी बीडमध्ये राष्ट्रवादी भवन, राजकीय नेते यांची कार्यालय झाल्यानंतर बीड व आकाशवाणी केंद्रालाही आग लावली. दरम्यान साठे चौकातील राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या निवास स्थानावरही आंदोलकांनी दगडफेक केली. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांचा रोष दिसून येत होता.

Beed Maratha Andolan : क्षीरसागरांचा बंगलाही पेटवला

बीड येथे मराठा आंदोलनाला हिंसक व लागले असून राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालय पेटवल्यानंतर विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर नगर रोड येथील निवासस्थानी पेटवून देण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button