Rajendra Patil-Yadravkar : ‘अपक्ष’ ही माझी भूमिका कायम राहील : राजेंद्र पाटील-यड्रावकर

Rajendra Patil-Yadravkar : ‘अपक्ष’ ही माझी भूमिका कायम राहील : राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील जनतेच्या विश्वासामुळेच मला विधीमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. तालुक्याच्या विकासासाठी मला सत्तेत सहभागी व्हावे लागले. सध्या घडत असलेल्या घडामोडीत मी सहभागी असलो तरी, जात, धर्म, वंशभेद आमच्या रक्तात नाही. अपक्ष ही माझी भूमिका कायम राहील आणि सर्वांना सोबत घेवून काम केले जाईल, असे सांगत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar)  यांनी मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला.

यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar)  म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मी वचननाम्याद्वारे शिरोळ तालुक्यातील जनतेला शब्द दिला होता. त्याप्रमाणे बेरोजगार, नव-नवे प्रकल्प, रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा, गावागावांचा विकास, रस्ते, ग्रामपंचायतीच्या इमारती, विविध जाती धर्मांच्या लोकांसाठी सामाजिक सभागृहे, सांस्कृतिक भवन उभारणे, युवकांसाठी व्यायाम शाळा, उदयोन्मुख खेळाडूंसाठी तालुकास्तरावर सुसज्ज क्रीडा संकुल उभारणे. यासह विविध कामे अशी अडीच वर्षात तब्बल 380 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. शिरोळ भव्य क्रीडा संकूल, तालुक्यातील 12 हजार हेक्टर क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण, क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी 80 टक्के शासन निधी मिळावा. यासाठी 125 कोटी निधीसाठीचा प्रस्ताव शासनाच्या जलसंधारण विभागाकडे सादर केला आहे, असेही ते म्‍हणाले.

खिद्रापूर मंदिर संवर्धन, जयसिंगपूर शासकीय विश्रामगृह, जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुतळे उभारणेसाठी मान्यता मिळाली असून हे दोन्ही पुतळे लवकरच उभारले जातील. तर 105 कि.मी. पाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे.  काहीही घडामोडी होवू दे त माझी अपक्ष भूमिका कायम असणार असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news