पुढारी ऑनलाईन डेस्क :
शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगरमधील कार्यालयावर आज संतप्त शिवसेनिकांनी दगडफेक केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिंदे समर्थक आमदारांविरोधात शिवसैनिकांना आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहेत. शिंदे समर्थक आमदारांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. आज आक्रमक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील कार्यालयावर दगडफेक केली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.