Monsoon Update | मान्सून जोर’धार’! पुढील ४ दिवस पावसाचे, ‘या’ भागांत रेड अलर्ट

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सून (Monsoon Update) सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही हवामान केंद्राने म्हटले आहे.

मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ जून दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार (६४.५-११५.५ मिलिमीटर) ते अत्यंत जोरदार पाऊस (११५.५-२०४.४) पडण्याची शक्यता आहे. तसेच २३ ते २५ जून दरम्यान या भागात अत्यंत जोरदार पाऊस कायम राहणार राहील. यामुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कोकण, गोव्यात रेड अलर्ट

पुढील ५ दिवसांत केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत भागात तसेच कोकण आणि गोव्यात मुसळधार मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यात २१ ते २२ जून दरम्यान अत्यंत जोरदार (२०४.४ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो) पावसाचा इशारा दिला आहे. या भागात २३ ते २५ जून दरम्यानही अत्यंत जोरदार पाऊसाची शक्यता असल्याचे सांगत हवामान विभागाने येथे रेड अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भासाठी यलो अलर्ट

२२ जून रोजी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरीसह मराठवाडा विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये २२ ते २५ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे ऑरेज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, गडचिरोली जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यात २५ जून रोजी मुसळधारेची शक्यता असल्याने येथे ऑरेज अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत २५ जूनपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.

मान्सून कुठे पोहोचला?

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, विदर्भाचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, उप-हिमालयीन पश्चिम बंगालचा काही भाग आणि झारखंडच्या काही भाग व्यापला आहे.

जोरदार पाऊस म्हणजे किती?

जोरदार पाऊस (६४.५-११५.५ मिलिमीटर)
खूप जोरदार पाऊस (११५.६-२०४.४ मिलिमीटर)
अत्यंत जोरदार पाऊस (२०४.५ मिलिमीटर)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news