Madhuri Elephant Returning Nandani: माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात परतणार; जनआंदोलन अन् आजी-माजी खासदारांच्या प्रयत्नांना यश

Madhuri Elephant Returning Nandani
Madhuri Elephant Returning Nandanipudhari
Published on
Updated on

Madhuri Elephant Returning Nandani: शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची लाडकी माधुरी हत्ती अखेर पुन्हा आपल्या घरी परतणार आहे. नांदणी मठातील माधुरीच्या संभाव्य पुनरागमनामुळे कोल्हापूर आणि शिरोळ तालुक्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कायदेशीर लढा, शासन स्तरावरील पाठपुरावा आणि मोठ्या जनआंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, माधुरी आज रात्री वनतारामधून (गुजरात) कोल्हापूरच्या दिशेने रवाना होण्याची दाट शक्यता आहे.

Madhuri Elephant Returning Nandani
Madhuri Elephant | वर्षपूर्तीनंतर नांदणीच्या माधुरी हत्तीणीच्या पूनरागमनाची प्रतीक्षा!

राजू शेट्टींचा दुजोरा

माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना या वृत्तास दुजोरा दिला आहे. नांदणी मठात माधुरीच्या देखभालीसाठी आणि राहण्यासाठी मठाजवळ योग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यासंदर्भात हाय पॉवर कमिटीने नेमलेले प्रतिनिधी मंडळ आणि वनताराच्या टीमने नांदणीत येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत माधुरी प्रकृतीने ठणठणीत असल्याची खात्री पटल्यामुळे तिच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Madhuri Elephant Returning Nandani
Madhuri Elephant | नांदणीच्या माधुरी हत्तीणीच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली? सोयीसुविधांचा 20 दिवसांत अहवाल द्या

माधुरीसाठी ४५ किलोमीटर लाँग मार्च

गेल्या वर्षी नांदणी ते कोल्हापूर असा ४५ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात आला होता, ज्यामध्ये लाखो नागरिक, महिला आणि लहान मुले सहभागी झाले होते. या जनआंदोलनाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाला आपल्या आधीच्या निर्णयात बदल करून योग्य ती काळजी घेत माधुरीला नांदणी मठात परत पाठवण्याचे आदेश द्यावे लागले होते. हाय पॉवर कमिटीने वनतारा, नांदणी मठ, पेटा आणि महाराष्ट्र वनखात्याशी समन्वय साधून हा अंतिम निर्णय घेतला आहे.

Madhuri Elephant Returning Nandani
Raju Shetti : शेतकऱ्यांची एक इंचही जमीन घेऊ देणार नाही

काही महिन्यांपूर्वी अश्रूच्या डोळ्यांनी निरोप दिलेली लाडकी माधुरी पुन्हा मठात येणार असल्याने कोल्हापूरकरांमध्ये आनंदाची लाट पसरली असून, ती प्रत्यक्ष कोल्हापुरात पोहोचल्यावर जल्लोषात स्वागत केले जाण्याची शक्यता आहे.

Madhuri Elephant Returning Nandani
Raju Shetti | देशात २० हजार कोटींचा साखर घोटाळा : राजू शेट्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news