Madhuri Elephant | नांदणीच्या माधुरी हत्तीणीच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली? सोयीसुविधांचा 20 दिवसांत अहवाल द्या

उच्चस्तरीय समितीचे सदस्य, सेंट्रल झूचे सदस्य, महाराष्ट्र शासन वनविभागाचे प्रतिनिधी यांची संयुक्त कमिटी स्थापन
Nandani Madhuri Elephant News
Nandani Madhuri Elephant News Pudhari
Published on
Updated on

Nandani Madhuri Elephant Case

जयसिंगपूर : नांदणी (ता.शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाकडे माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी नांदणी येथे माधुरी हत्तीणीसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे सदस्य, सेंट्रल झूचे सदस्य, महाराष्ट्र शासन वनविभागाचे प्रतिनिधी यांची संयुक्त कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीने सोयी सुविधांची पाहणी करून 20 दिवसात उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सादर करण्याचे आदेश उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा यांनी ऑनलाईन सुनावणीत दिले.

याबाबत अधिक माहिती अशी, माधुरी हत्तीण परत मिळण्यासाठी नांदणी मठ, वनतारा व राज्य शासनाच्यावतीने उच्च समितीकडे यापूर्वी अर्ज दाखल करण्यात आले आहे. समितीने यापूर्वी देखील सुनावणी घेतली होती. दरम्यान, माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी प्रशासकीय व स्थानिक पातळीवर वेग आला आहे.

Nandani Madhuri Elephant News
Madhuri Elephant Case Hearing | नांदणीच्या माधुरी हत्तीणप्रकरणी मंगळवारी सुनावणी

नांदणी मठ आणि वनतारा फौंडेशनची टीम यांच्याकडून नांदणी येथील निशिदाच्या परिसरात हत्तीणीच्या जुन्या असलेल्या जागेवर रंगरगोटी करण्यात आली आहे. यात गारव्यासाठी शॉव्हर आणि कुलर बसविण्यात आला आहे. सुरक्षितेसाठी दोन्ही बाजूजा जाळी मारण्यात आली आहे. उंच भागावर दगडाचे पिचिंग काम पूर्ण करण्यात आली असून झाडे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर हत्तीणीसाठी वैद्यकीय कक्ष, अन्न विभाग व इतर सुविधा उभारण्यात आली आहेत.

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन सुनावणीला सुरुवात झाली. यात सोयीसुविधांचा अहवाल २० दिवसांत सादर करण्याचे आदेश सायंकाळी दिले. त्याचबरोबर या समितीबरोबर पेटाच्या १ सदस्याला हत्तीणीच्या सोयीसुविधांची पाहणी करता येणार आहे. 5 जूनचा माधुरी हत्तीणीच्या आरोग्याबाबतचा अहवाल अत्यंत सकारात्मक आला आहे.

याच पार्श्वभूमीवर माधुरी हत्तीणीला मठात परत आणण्यासाठी प्रशासकीय व उच्चस्तरीय समितीकडे दाद मागितली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या २० दिवसांत ही समिती नांदणीत येणार असून या अहवालानंतरच उच्चस्तरीय समिती पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला माधुरी हत्ती परत येण्याची आस लागून राहिली आहे.

Nandani Madhuri Elephant News
Madhuri elephant | ‘माधुरी’चा नांदणी मठात परतीचा मार्ग मोकळा

पेटाचा एका सदस्याला येता येणार

पेटा या संस्थेने माधुरी हत्तीणीला वनताराच्या वातावरणातून परत नांदणी येथे आणू नये अशी मागणी केली होती. मंगळवारच्या सुनावणीत उच्चस्तरीय समितीने स्थापन केलेल्या तिघांच्या कमिटीबरोबर पेटाच्या सदस्यालाही नांदणीत पाहणी करण्यासाठी येण्यास उच्चस्तरीय समितीने परवानगी दिली आहे. त्यामुळे येथील करण्यात आलेल्या सोयीसुविधा याच्या अहवालानंतरच पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news