Madhuri Elephant Return | माधुरी हत्तीचा कोल्हापूर येण्याचा मार्ग मोकळा; शुक्रवारपर्यंत नांदणीत पोहचणार?

उच्चस्तरीय समितीचा निकाल; महाराष्ट्रात येण्याबाबत परवानाही मिळाला
Vantara Madhuri Elephant Returning  Nandani Math
Vantara Madhuri Elephant Returning Nandani Math Pudhari
Published on
Updated on

Vantara Madhuri Elephant Returning Nandani Math

जयसिंगपूर : नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी बुधवारी सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली. यात नांदणी मठ, वनतारा, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने उच्चस्तरीय समितीला नांदणी मठात उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती देऊन माधुरी हत्तीणीला परत देण्याची मागणी करण्यात आली होती.

अखेर बुधवारी रात्री उच्चस्तरीय समितीने माधुरी हत्तीणला नांदणी येथे नेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचबरोबर नांदणी मठाकडून गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी परवाना (टीपी) मिळाला आहे. माधुरी हत्तीणीच्या माहुतसह तिघेजण वनतारा येथे पोहोचले असून शुक्रवार पर्यंत माधुरी हत्तीण परत येण्याची शक्यता आहे.

Vantara Madhuri Elephant Returning  Nandani Math
Madhuri Elephant Returning Nandani: माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात परतणार; जनआंदोलन अन् आजी-माजी खासदारांच्या प्रयत्नांना यश

२३ जून रोजी उच्चस्तरीय समितीने उच्चस्तरीय समितीचे सदस्य, सेंट्रल झूचे सदस्य, महाराष्ट्र शासन, वनविभागाचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर 17 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत ५ ऑगस्टपर्यंत नांदणी येथे माधुरी हत्तीणीसाठी केलेल्या सोयीसुविधांची पाहणी करण्याचे आदेश संयुक्त समितीला दिले होते. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी संयुक्त समितीने नांदणी येथे उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी करून याबाबतचा उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सादर केला होता.

त्यामुळे बुधवारी सायंकाळी ऑनलाईन सुनावणी झाली. यात पेटाने माधुरी हत्तीणीला नांदणी मठात पाठवू नये अशी मागणी केली. त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील ॲड.मनोज पाटील यांनी नांदणी येथे सध्या उभारण्यात आलेले सुविधा केंद्र हे थोड्या कालावधीसाठी उभारण्यात आलेले आहे. कायमस्वरूपीसाठी नव्याने लवकरच प्रशस्त असे हत्तीसाठी सोयीसुविधा उभारण्यात येणार आहे.

Vantara Madhuri Elephant Returning  Nandani Math
Madhuri Elephant | वर्षपूर्तीनंतर नांदणीच्या माधुरी हत्तीणीच्या पूनरागमनाची प्रतीक्षा!

सध्या उभारलेल्या ठिकाणी सूचनेनुसार सुविधा करण्यात आल्या आहेत. शिवाय वनतारा येथे माधुरी हत्तीणीची प्रकृती चांगली असल्याने नांदणी मठात तिला परत पाठविण्याची मागणी केली. उच्चस्तरीय समितीने सर्व बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा माधुरी हत्तीण नेण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे.

त्यानंतर नांदणी मठातील माधुरी हत्तीणीचे माहुत, नांदणीचे सागर शंभूशेटे, स्वप्निल देसाई हे गुजरात राज्यातील वनतारा येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात आणण्यासाठी परवाना (टीपी) मिळाला आहे. तसेच माधुरी हत्तीण गुजरात येथून नांदणी मठापर्यंत किती वेळेत आणायचे याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज सायंकाळी माधुरी हत्तीण गुजरात येथून निघाली. तर उद्यापर्यंत माधुरी हत्तीण नांदणी मठात येण्याची शक्यता आहे. याबाबत सोशल मीडियावरही माधुरी हत्तीणीच्या आगमनाच्या पोस्ट झळकत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news