कोल्हापूर : राऊतवाडी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना मोजावे लागणार पैसे

कोल्हापूर : राऊतवाडी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना मोजावे लागणार पैसे
Published on
Updated on

राशिवडे : पुढारी वृतसेवा : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्यास भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. धबधबास्थळ देखभाल दुरुस्ती खर्चासाठी पर्यटकांकडून कर रुपाने ही आकारणी केली जाणार आहे. यामध्ये प्रौढांकडून १० रुपये तर लहान मुलांसाठी ५ रुपयांची आकारणी केली जाणार आहे. हा निर्णय ग्रामसमितीने घेतला आहे.

यापुर्वी चारचाकी गाडी पार्कींगसाठी पर्यटकांकडून शुल्क आकारणी केली जात होती. राऊतवाडी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी अर्थिक कमतरता भासू लागली आहे. त्यासाठी ग्राम समितीने प्रवेश कर आकारणीतुन मिळणाऱ्या महसुली उत्पन्नातुन स्वच्छता, कचरा संकलन, स्वच्छतागृह, चेंजींग रुममध्ये लाईट व्यवस्था आणि याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार आदीचा खर्च यातुन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news