कोल्हापूर: मुदाळतिट्टा येथे भर पावसात रस्त्याचे काम

मुदाळतिट्टा येथे  भर पावसात रस्त्याचे काम सुरू असताना
मुदाळतिट्टा येथे भर पावसात रस्त्याचे काम सुरू असताना

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा: रहदारीने गजबजलेल्या मुदाळतिट्टा येथे भर पावसातच रस्त्याचे काम सुरू केले आहे. काम सुरु करताना वाहतुकीची कोणतीही काळजी न घेतल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. खोदाई केलेल्या रस्त्यात पाणी साठून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

राधानगरी, भुदरगड, कागल या तीन तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून मुदाळतिट्टा या ठिकाणाला महत्व आहे. गेल्या आठवड्यापासून राधानगरी – भुदरगड तालुक्यामध्ये प्रचंड प्रर्जन्यवृष्टी होत आहे. वेदगंगा नदीला महापूर आला आहे. या महापुराचे पाणी राधानगरी – निपाणी मार्गावर मुरगूड येथील स्मशान शेडजवळ रस्त्यावर आले आहे. त्यामुळे दोन दिवस येथून होणारी वाहतूक बंद आहे. अशातच निपाणी – मुदाळतिट्टा पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. त्यामुळे तिट्ट्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.

निपाणी – फोंडा मार्गावरील मुदाळतिट्टा येथे पावसाचा व वाहतुकीचा विचार न करता रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे साईड पट्टी ऐवजी रस्त्यावरच कंपनीचे वाहन (डंपर) उभा केला जात असून त्यातून पोकलेन द्वारा रस्ता खोदाई केलेली माती उचलून नेली जात आहे. या सर्व्हिस मार्गावर हा डंपर उभा केल्यामुळे अडचण निर्माण होऊन याचा फटका मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस होत होती. त्यामुळे वाहन चालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.ॉ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news