कोल्‍हापूर : खा. संजय मंडलिक यांनी चिमगाव ग्रामपंचायतीसाठी बजावला मतदानाचा हक्क

खासदार संजय मंडलिक
खासदार संजय मंडलिक

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा :  खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या कुटुंबियांसह चिमगाव (ता. कागल ) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. खा. संजय मंडलिक आणि त्यांच्या पत्नी सौ. वैशाली मंडलिक,  ॲड विरेंद्र मंडलिक व समरजित मंडलिक यांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीसाठी चिमगाव विद्यामंदिर येथील केंद्रावर मतदान केले.

मंडलिक कुटुंब चिमगावचे रहिवासी व मतदार असल्याने त्यांनी येथे मतदान केले. चिमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत होत आहे. माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुध्द मंडलिक- घाटगे व पाटील अशा गटांची युती या निवडणुकीत असल्याने अतिशय चुरस निर्माण झाली आहे.

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या चिमगाव ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान पार पडत आहे. मतदान केंद्रावरुन मतदान करून बाहेर पडताना खासदार मंडलिक यांनी कार्यकर्त्याशी हितगुज केले. दरम्यान लक्षवेधी ठरलेल्या चिमगाव ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news