कोल्हापूर : दारूच्या नशेत मुलाकडून आईचा खून; कागल तालुक्यातील घटना

file photo
file photo
Published on
Updated on

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील वंदूर येथील वाईगडे मळा येथे आपल्या जन्मदात्या आईचा दारूच्या नशेत विळ्याने तीन ते चार वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खून करून घरात बसलेल्या निलेश अशोक वाईगडे (वय ३०) या तरुणाला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनिता अशोक वांईगडे (वय ५०) असे दुर्दैवी मातेचे नाव आहे.

निलेश वाइंगडे याच्या वडीलांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो आणि त्याची आई सुनिता वांईगडे हे दोघेच घरी राहत होते. त्याला तीन एकर बागायत शेती असूनही शेती न करता रोजगाराला जात होता. तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. तो ऊस तोडीचे काम करायचा. काल मराठा आरक्षणासाठी दारूच्या नशेत त्याने घरासमोरच्या रस्त्यावर दगड आडवी टाकून रस्ता बंद केला होता. तसेच रस्त्यावर कचरा देखील पेटवला होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

बुधवारी मध्यरात्री आई घरात झोपलेली असताना नशेत त्याने विळ्याने तीन ते चार वार करून तिला ठार केले. त्यानंतर तो रात्री दारातच झोपला. वार इतके जोरदार केले की रक्ताच्या चिळकांडी भिंतीवर आणि भांड्यावर उडालेल्या होत्या. तसेच जमिनीवरही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता. रक्त त्यांने पुसूनही काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी तो उठून पुन्हा मद्य प्राशन केल्यानंतर जवळच राहत असलेल्या चुलत भावाकडे जाऊन आई उठत नाही म्हणून सांगू लागला. चुलत भावाने घरी येऊन पाहिल्यानंतर त्यांने डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी येऊन संशयीत आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news