Pimpri News : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये 20 लाखांची फसवणूक

file photo
file photo

पिंपरी : ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगून तिघांनी मिळून एकाची 20 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत वाकड येथे घडली. अमित मदनराव काटे (39, रा. वाकड. मूळ रा. नागपूर) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, केविन, लिसा, वॉरेन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि पैसे ट्रान्सफर झालेल्या युपीआय आयडीधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. फिर्यादीचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटरअ‍ॅप ग्रुपला जॉईन झाला.

आरोपींनी ग्रुपमध्ये एक लिंक पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पडले. त्यानंतर ऑनलाईन ट्रेडिंगच्या बहाण्याने पैसे घेण्यास सुरुवात केली. काही रक्कम भरल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रेडिंग खात्यावर एक कोटी 23 लाख जमा झाल्याचे दाखवण्यात आले. तसेच, पैसे काढून घेण्यासाठी दहा टक्के कर भरावा लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार, फिर्यादी यांनी एकूण 20 लाख 85 हजार भरले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस कोणतीही रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news