

शित्तूर वारुण : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील उदगिरपैकी केदारलिंगवाडी येथे बुधवारी (दि.२१) बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मनीषा रामू डोईफोडे हिच्या कुटुंबीयांना आज (दि.२३) वनविभागाच्या वतीने तातडीची मदत देण्यात आली.
तातडीची मदत म्हणून दहा लाख रुपयांचा धनादेश व राहिलेल्या दहा लाखांपैकी पाच लाखांच्या दोन मुदतबंद ठेव पावत्यांचे बँकेसाठीचे पत्र देण्यात आले. मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर या कुटुंबांना दुसऱ्या जागी स्थलांतर होण्यासाठी वनविभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याला दोन दिवसांत सापळा लावून पकडण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. उदगिरी परिसरात वनविभागाचे गस्त पथक कार्यरत झाले आहे. जिथे हल्ला झाला त्या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ॲनिमल रेस्क्यू टीम दाखल झाली आहे.
हेही वाचलंत का ?