कोल्हापूर : भरदिवसा दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून

राजारामपुरीत पूर्ववैमनस्यातून तीन सख्ख्या भावांसह चौघांनी केला गेम
rajarampuri murder case
कोल्हापूर : घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. तसेच खून करण्यासाठी वापरलेले दगड उचलताना पोलिस कर्मचारी. छाया : नाज ट्रेनर
Published on
Updated on

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तीन सख्ख्या भावांसह चौघांनी राजारामपुरीत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. मंगळवारी (दि. 2) दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळावरूनच दोघांना अटक केली. चौघेही संशयित मद्यधुंद अवस्थेत होते. मृताच्या तोंडावर दगड मारून चेंदामेंदा केल्याने घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.

rajarampuri murder case
वाढदिवसाला दारू दिली नाही; मित्राचा चौथ्या मजल्यावरून फेकून खून

पंकज निवास भोसले (वय 32, रा. मूळ कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी 14 वी गल्ली) असे मृताचे नाव आहे. किशोर ऊर्फ नीलेश विक्रम काटे, गणेश विक्रम काटे व उमेश विक्रम काटे यांच्यासह अमित गायकवाड (सर्व रा. कनाननगर) या चौघांनी पंकजचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी नीलेश काटे व गणेश काटे यांना पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे व पोलिस हवालदार अरविंद पाटील यांनी मोटारसायकलवरून पळून जात असताना घटनास्थळीच ताब्यात घेतले.

rajarampuri murder case
पाथरी शिवारात अज्ञात महिलेचा खून

पंकज हा कनाननगर येथे राहत होता. काही वर्षांपासून तो राजारामपुरी 14 व्या गल्लीत राहतो. व्यावसायिक मनीष संबर्गे यांच्याकडे तो चालक म्हणून काम करतो. काटे व पंकज यांच्यात कनाननगरमध्ये असल्यापासूनच वैमनस्य होते. पंकजने काटे बंधूंना मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे काटे बंधूंनी पंकजचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. मंगळवारी सकाळपासूनच काटे बंधूंसह अमित गायकवाड असे चौघे पंकजच्या मागावर होते. दुपारी सर्वजण एकत्रित दारू प्यायले. त्यानंतर दोन मोटारसायकलवरून चौघेजण राजारामपुरीतील पंकज राहत असलेल्या ठिकाणी आले; परंतु पंकज घरात नव्हता, त्यामुळे सर्वजण राजारामपुरी 14 व्या गल्लीत त्याची वाट पाहत होते. संबर्गे दाम्पत्याला मोटारीतून घेऊन पंकज बाहेर गेला होता. दुपारी 2.30 च्या सुमारास ते घरी परतले. बंगल्याच्या दारातच किशोर काटे याने मोटार अडविली. तसेच संबर्गे दाम्पत्याला, तुम्ही घरात जा, असे दरडावले. त्यांनी काय झाले, अशी विचारणा केली असता; आमचा जुना हिशेब आहेे. तुम्ही यात पडू नका. तुम्ही तुमच्या घरात जावा, असे सुनावले. त्यानंतर नीलेशने पंकजला गळपट्टी धरूनच मोटारीतून बाहेर ओढले, त्यामुळे दोघांत वादावादी झाली.

rajarampuri murder case
Fact Check : वसईत प्रेयसीचा भर रस्‍त्‍यातील खून 'लव्‍ह जिहाद'चा प्रकार होता का?

नीलेशने पंकजला मोटारीतून बाहेर काढल्यानंतर गणेश, उमेश यांच्यासह अमित गायकवाड तेथे आले. त्यांनी पंकजला ओढून रस्त्यावर आणले. त्यापैकी एकाने पंकजच्या डोक्यात मागच्या बाजूने काठी मारली. काठीचा जोरदार मार लागल्याने पंकज तडफडत जीवाच्या आकांताने त्यांच्या तावडीतून सुटून पळू लागला. त्याबरोबरच हल्लेखोरही त्याचा पाठलाग करू लागले. काही अंतरावर पुन्हा हल्लेखोरांनी पंकजला गाठले आणि काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. सुमारे शंभर मीटरपर्यंत त्याला मारत नेले. अखेर राजारामपुरी-टाकाळा रस्त्यावरील 13 व्या गल्लीच्या कोपर्‍यावर पंकज खाली पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्या ठिकाणी असलेले दगड घेऊन त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला. पंकजच्या छातीवर बसून दगडांनी त्याचा चेहरा ठेचून काढला. हल्लेखोर एवढ्या निर्घृणपणे मारत होते की, पंकजचा संपूर्ण चेहरा ओळखण्यापलीकडे गेला होता. त्यामुळे घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. यात पंकजचा जागीच मृत्यू झाला.

rajarampuri murder case
गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा कुर्‍हाडीने खून

स्थानिक नागरिकांनी खुनीहल्ल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना कळविली. हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असल्याने पोलिस निरीक्षक तनपुरे, हवालदार पाटील यांच्यासह इतर घटनास्थळी दाखल झाले. पंकज निपचित पडल्यानंतर हल्लेखोर पसार होऊ लागले. त्यापैकी नीलेश व गणेश एका मोटारसायकलवर, तर उमेश व अमित दुसर्‍या मोटारसायकवर होते. त्यापैकी उमेश व अमित हे पळून गेले, तर नीलेश व गणेश यांची मोटारसायकल सुरू झाली नसल्याने ते पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेऊन पंकजला तत्काळ उपचारांसाठी सीपीआरमध्ये पाठविले; परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

rajarampuri murder case
कवलापुरात हल्लेखोर तरुणाचा जमावाकडून खून

नव्या कायद्यानुसार कोल्हापुरात पहिला खुनाचा गुन्हा

1 जुलैपासून देशात नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. आयपीसी बंद करून आता बीएनएस लागू झाले आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. आयपीसीनुसार, यापूर्वी खुनाच्या गुन्ह्याला 302 कलम लागत होते. मात्र, आता नव्या फौजदारी कायद्यानुसार 103 (1) हे कलम लावण्यात आले. नव्या कायद्यानुसार कोल्हापुरातील हा पहिला खुनाचा गुन्हा ठरला.

rajarampuri murder case
सरपंच खून प्रकरण : आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना अटक

सीपीआरमध्ये गर्दी

पंकज भोसले याचा खून झाल्याचे समजताच कनाननगरमधील तरुणांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे सीपीआरमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, पंकजच्या मागे आई, बहिणी असा परिवार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news