गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा कुर्‍हाडीने खून

अनैतिक संबंधांच्या संशयातून खून
Amravati murder News
अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून File Photo
Published on
Updated on

अमरावती :अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी जिल्ह्यातील कामनापूर येथे घडली.

मृत पत्नीचे नाव लता कोतलाम (52) असून आरोपी पतीचे नाव मधुकर कोतलाम ( 60) असे आहे. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. यावरून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news