बिद्री; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सर्पमित्र बाजीराव कुदळे यांनी गुरुवारी (दि.१७) कासारपुतळे येथे सुमारे आठ फुटाचा अजगर पकडून त्याला आधीवासात सोडून दिले. कुदळे यांनी आतापर्यंत अतीविषारी, बिनविषारी असे साडेपाच हजार विविध प्रकारचे साप पकडून आधीवासात सोडले आहेत.
साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. पण भितीपोटी साप मारण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात. यामुळे निसर्ग चक्रामध्ये अडथळा येतो. साप दिसताच प्रशिक्षित असणाऱ्यांनी तो पकडून आधीवासात सोडणे गरजेचे आहे. साप कधी स्वतःहून हल्ला करीत नाही. पण त्याला आपला धक्का लागल्यास स्वसरंक्षणासाठी चावा घेतो.
सर्वच साप विषारी नसतात. आतापपर्यंत नागरी वस्तीत आलेल्या सुमारे साडेपाच हजार सापांना पकडून आधीवासात सोडल्याचे कुदळे यांनी सांगितले. रात्री अपरात्री नागरिकांचे फोन येताच सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. गुरुवारी कासारपुतळे स्मशानभूमीजवळ सुमारे साडेआठ फुटाचा अजगर पकडून त्याला आधीवासात सोडून दिले. यासाठी शशिकांत त्यांना चव्हाण यांचे सहकार्य लाभले. दुर्मिळ अशा तस्कर जातीच्या साप पकडल्यानंतर नऊ अंडी मिळाली असून ती उबविण्यास सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत. आतापर्यंत विरोळे, कासव आदींची कृत्रिमरीत्या अंडी उबवून त्यांनी पिल्ली मिळविली आहेत.
हेही वाचा;