कोल्हापूर: कडवी नदीवरील शिरगाव पुलावर मगरीचा वावर: परिसरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर: कडवी नदीवरील शिरगाव पुलावर मगरीचा वावर: परिसरात भीतीचे वातावरण

विशाळगड: पुढारी वृत्तसेवा: शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव – सांबू दरम्यानच्या कडवी नदीवरील पुलावर मगरीचा बिनधास्त वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित विभागाने मगरीचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

कडवी नदीपात्रात मगरींचे वास्तव्य असल्याचे अनेकवेळा निष्पन्न झाले आहे. नदीपात्रात अनेकांना दर्शनही झाले आहे. मात्र, नदीपात्र सोडून मोकळ्या जागेत वावरताना कोणासही आजअखेर मगरीचे दर्शन झाले नव्हते. कडवी नदीवरील शिरगाव- सांबू दरम्यानच्या पुलावर मगर बिनधास्त वावरताना टेकोली येथील दत्ता जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी पाहिले. ते कामानिमित्त सरूड गावी गेले होते. रात्री उशिरा ते चारचाकी वाहनातून मलकापूरकडे येत असताना पुलाच्या मधोमध पूर्ण वाढ झालेली मगर सांबू गावाच्या दिशेने चालत जात असल्याचे त्यांनी पाहिले.

त्यांनी हा क्षण मोबाईलमध्ये व्हिडीओद्वारे कॅच करून नागरिकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. पुलाजवळ शिरगाव, सांबू गावातील लोकांचा वावर अधिक असतो. शिवाय गुरांना धुणे, पाणी पिण्यासाठी आणले जाते. महिला व पुरुष कपडे धुणे, आंघोळ करणे आदींसाठी येतात, तसेच मासेमारी करणाऱ्या लोकांचाही येथे वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून संबंधित विभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news